कांदा साठवणुकीसाठी मिळणार सरकारी अनुदान . पहा संपूर्ण माहिती | Agriculture Storage Subsidy

Agriculture Storage Subsidy – कांदा आणि लसूण ही महाराष्ट्रातील महत्त्वाची नगदी पिके आहेत, परंतु काढणीनंतर साठवणुकीत होणारे नुकसान (Post-harvest loss) हे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे. पारंपारिक पद्धतीमुळे कांद्याची गुणवत्ता लवकर खालावते आणि आर्थिक फटका बसतो. यावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत (MIDH) कमी खर्चात कांदा चाळ आणि लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी आकर्षक अनुदान योजना सुरू केली आहे.

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सुवर्णसंधी : Agriculture Storage Subsidy

जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या मालाची वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक क्षमता वाढवणे आणि हंगामाबाहेर योग्य दर मिळवून देणे हा आहे.

Leave a Comment