Rule Change From 1st january : डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असतानाच, सामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वाचे आर्थिक आणि कायदेशीर बदल लागू होणार आहेत. जर तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी खालील तीन कामे पूर्ण केली नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक
जर तुमच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील सर्व वाहनांना आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य झाले आहे.
- अंतिम मुदत: ३१ डिसेंबर २०२५.
- काय होईल? मुदत संपल्यानंतर ज्या वाहनांवर ही हाय-टेक नंबर प्लेट नसेल, त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाईल.
- कसे करायचे? तुम्ही अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करताना आरसी बुक (RC), विम्याची प्रत आणि इंजिन/चेसी नंबर सोबत ठेवा.
पॅन-आधार लिंकिंग: अन्यथा पॅन होईल ‘कचरा’
आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड (PAN Card) हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. मात्र, ते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला मोठे फटका बसू शकतो.
- धोका: ३१ डिसेंबरनंतर लिंक नसलेले पॅन कार्ड ‘निष्क्रिय’ (Inactive) केले जाऊ शकते.
- परिणाम: पॅन निष्क्रिय झाल्यास बँक खाते उघडणे, मोठे व्यवहार करणे आणि इन्कम टॅक्स रिफंड मिळवण्यात अडचणी येतील.
- शुल्क: सध्या आधार-पॅन लिंक करण्यासाठी १००० रुपये दंड भरावा लागत आहे. निष्क्रिय होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे केव्हाही चांगले.
लाडकी बहीण योजना: ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य
महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
- नियम: योजनेचे हफ्ते नियमित मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
- नुकसान: जर ३१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर दरमहा मिळणारे १५०० रुपये बंद होऊ शकतात.
- कुठे करायचे? आपल्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा अधिकृत ॲपद्वारे महिला ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
महत्त्वाचा सल्ला
घाईघाईत शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे ३१ डिसेंबरची वाट न पाहता आजच ही कामे पूर्ण करा. तुमच्या एका चुकीमुळे नवीन वर्षाची सुरुवात आर्थिक दंडाने होऊ शकते.