Lek Ladaki Yojana – मित्रांनो, महाराष्ट्रातील लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि मोठा अपडेट समोर आला आहे. ज्या मुलींसाठी अर्ज करण्यात आले आहेत आणि ज्या लाभार्थी मुली पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या बँक खात्यात आता राज्य शासनाचे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
यासाठीच, राज्य शासनाने ₹25 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी लेक लाडकी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अनुदान वितरणासाठी वापरला जाणार आहे.
काय आहे लेक लाडकी योजना? Lek Ladaki Yojana
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने 30 ऑक्टोबर 2023 रोजी ‘लेक लाडकी योजना’ लागू करण्यास मंजुरी दिली. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचे सक्षमीकरण करणे, त्यांचा जन्मदर वाढवणे, आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
योजनेचे मुख्य लाभ (₹1,01,000 अनुदान):
या योजनेत 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या लाभार्थी मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण ₹1,01,000 चे अनुदान दिले जाते:
| टप्पा (Event) | अनुदानाची रक्कम |
| जन्मानंतर | ₹5,000 |
| इयत्ता पहिलीत प्रवेश | ₹6,000 |
| इयत्ता सहावीत प्रवेश | ₹7,000 |
| इयत्ता अकरावीत प्रवेश | ₹8,000 |
| 18 वर्षे पूर्ण झाल्यावर (विवाहयोग्य वयात) | ₹75,000 |
यापूर्वी, योजनेसाठी ₹16 कोटींचा निधी उपलब्ध झाला होता आणि आता अर्ज केलेल्या व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हे अनुदान वितरित करण्यासाठी आज पुन्हा ₹25 कोटींचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे.
नकारात्मकतेला पूर्णविराम: अनुदानाचे वितरण सुरू!
गेल्या काही दिवसांपासून या योजनेबद्दल समाजात काही प्रमाणात नकारात्मकता पसरली होती. ‘योजनेसाठी अर्ज केले, पण पैसे कधी मिळणार?’ किंवा ‘माझी मुलगी शाळेत जायला लागली, पण लाभ मिळाला नाही,’ अशा अनेक प्रतिक्रिया येत होत्या. अनेक पालक योजनेबद्दल साशंक होते.
पण आता या सर्व नकारात्मकतेला पूर्णविराम मिळाला आहे!
उपलब्ध झालेल्या ₹25 कोटींच्या निधीतून, पात्र ठरलेल्या मुलींना योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ₹5,000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात क्रेडिट केली जाणार आहे. हे पैसे मुलीच्या जन्मानंतर तत्काळ मिळणारे पहिले अनुदान आहे.
ज्या मुली 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आल्या आहेत, त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. यानंतर जसजसे मुलीचे वय वाढत जाईल आणि ती शिक्षणाचे टप्पे पूर्ण करेल, तसतसे पुढील अनुदानही खात्यात जमा होत जाईल.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा कराल?
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन (Offline) पद्धतीने पूर्ण केली जाते.
- कोणाकडे अर्ज करायचा? तुम्ही तुमच्या गावातील किंवा परिसरातील अंगणवाडी सेविके कडून योजनेचा अर्ज भरू शकता. त्या तुम्हाला अर्ज भरण्यास मदत करतील.
योजनेच्या महत्त्वाच्या अटी व पात्रता निकष :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- जन्म तारीख: मुलगी 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली असावी.
- अपत्य संख्या: योजनेचा लाभ कुटुंबातील पहिल्या दोन मुलींसाठी लागू आहे.
- अपवाद: जर पहिल्या अपत्यानंतर जुळ्या मुलींचा जन्म झाला, तरीही योजना लागू राहते.
- नियम: जर पूर्वी दोन अपत्ये असतील (उदा. दोन मुले किंवा एक मुलगा-एक मुलगी) आणि तिसरी मुलगी असेल, तर अशा परिस्थितीत योजना लागू होणार नाही.
- योजनेच्या अटी-शर्ती आणि निकषांबद्दलची सविस्तर माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Lek Ladaki Yojana






